सोलापूर स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची धडाकेबाज कामगिरी. ◾पोखरापूर व मांडवे वस्ती येथे अवैद्य व्यवसायावर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक.

सोलापूर स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची धडाकेबाज कामगिरी.  ◾पोखरापूर व मांडवे वस्ती येथे अवैद्य व्यवसायावर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक.


--------------------------------------------------------------------------
मोहोळ (दै.पंढरी नगरी न्यूज) मोहोळ तालुक्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखु व अवैधरित्या दारू विक्री करणारे आरोपींवर कार्यवाही करून सदर आरोपी यांचेकडुन ५८० किलो सुगंधित तंबाखु व देशी विदेशी दारू असा एकुण ४,८१,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, सोलापुर ग्रामीण यांनी अंमली पदार्थावी व अवैध दारू विक्री करणारे आरोपींचा शोध घेवुन त्यांचेवर कडक कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सुचना दिल्या होत्या.

सदर सुचने प्रमाणे पो.नि. संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पथकाला कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते. दि. १४/१०/२०२६ रोजी सपोनि / विशाल मुळे व त्यांचे पराक हे मोहोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथाकातील पोकों थोरात व घाडगे यांना त्यांचे गोपनिय बातमिदारामार्फत आत्रीशीर बातमी मिळाली की, इसम नामे सुधाकर प्रभु मांडवे यांचे मांडवे वस्ती ता. मोहोळ जि. सोलापूर येथील पत्राचे शेडमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखुवा साठा ठेवला आहे

सदरची माहिती संजय जगताप , पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना दिली असता त्यांनी मोहोळ पोलीस स्टेशन व अन्न व औषध प्रशासन विभाग, सोलापूर यांना सोबत घेवुन पुढील कार्यवाही करणेबाबत आदेशीत केले.

त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि मुळे, व त्यांचे पथक, मोहोळ पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार व अन्न व औषध प्रशासन विभाग, सोलापूर यांनी गोपनिय बातमिप्रमाणे इसम नामे सुधाकर प्रभु मांडवे रा. मांडवे वरती ता. मोहोळ जि. सोलापूर यांचे मांडवे वस्ती येथील पत्रामध्ये छापा कारवाई केली असता सदर पत्रा शेडमध्ये १२ पांढरे रंगाचे प्लॅस्टिक पोती मिळून आहे. सदरचे पोती उघडुन त्यातील पॉकेट तपासून पाहिले असता त्यामध्ये १) विना लेबल सुगंधित तंबाखु (पिवळया रंगाचे पॉकेट) ५ पोती, एकूण ६०० पाकिटे किंमत २,४०,०००/- रू व २) ३३२० गुडलक सुगंधित तंबाखुचे ०७ पोती त्यामध्ये एकुण ५६० पाकिटे किमत २,२४,०००/- रू असा एकूण ४,६४,०००/-रू चा मुद्देमाल मिळून आल्याने ती जप्त करून पुढील कार्यवाही करीता मोहोळ पोलीस स्टेशन येथे आपुन जमा केली आहे. तसेच सदरचा पत्राशेड हा अन्न व औषध प्रशासन विभाग, सोलापूर यांचेकडील सिलबंद करण्यात आलेला आहे.

सदर बाबत सुधाकर प्रभु मांडवे यांचे मांडवे वस्ती ता. मोहोळ जि. सोलापूर याचेविरूध्द मोहोळ पोलीस स्टेशन गु.ट.नं. ९६४/२०२६ भा.व्या. सं.क. २२३,२७४, २७५,१२३ सी अन्न सुरक्षा व आनंदे कायदा २००६ कलम २३(२) (), २७ (३) (६), ३० (२) (A),५९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मोहोळ पोलीस स्टेशन हे करीत आहेत

तसेच मोहोळ पोलीस स्टेशन हद्‌दीत पोखरापुर येथे इसम नामे दादासाहेब राजाराम नरोटे रा. पोखरापुर ता. मोहोळ जि. सोलापूर हे १७,०००/- रू चे देशी विदेशी कंपनीचे वारू अवैधरित्या विक्री करीत असताना मिळून आल्याने त्यावेवर मोहोळ पोलीस स्टेशन गु.र.नं. ९५९/२०२६ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे कारवाई केली आहे.

सदरची कामगिरी  पोलीस अधिक्षक, अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक, विजय कबाडे, उप विभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग, सुरज जगताप पोलीस निरीक्षक, संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक दिपक पाटील नेम. मोहोळ पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / विशाल मुळे, पोली हवालदार/ मनोज भंडारी, पंकज महिंद्रकर, सिध्दराम कंटोळी, व्यंकटेश मोरे, पोकों/ राहुल दोरकर, हरिष थोरात व बाळराजे घाडगे तसेच मोहोळ पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी बजावली.