सोलापुर महसूल विभागाची मोठी कारवाई ,सत्ताधारी भाजप, शिवसेना नेत्यांच्या दगड खाणीसह दक्षिण तालुक्यातील १५ खाणी प्रशासनाकडून सील..

सोलापुर महसूल विभागाची मोठी कारवाई ,सत्ताधारी भाजप, शिवसेना नेत्यांच्या दगड खाणीसह दक्षिण तालुक्यातील १५ खाणी प्रशासनाकडून सील..

---------------------------------------------------------------------------------

सोलापूर( दै. पंढरी नगरी न्यूज) : पर्यावरण मंजुरी व नुतनीकरण आदेश नसल्यामुळे  शिवसेना जिल्हाप्रमुख, भाजपच्या माजी नगरसेविका व भाजप नेत्यांसह दक्षिण सोलापूर तालुक्यातील तब्बल १५ दगडखाण सील करण्याची कारवाई तहसील कार्यालयाने केली आहे. दक्षिण तालुक्यातील गंगेवाडी, धोत्री, वळसंग व कासेगाव हद्दीतील या दगड खाणी आहेत.

मौजे गंगेवाडी वळसंग / धोत्री या ठिकाणी दगडखाण असून सदर दगड खाण चालू ठेवणेस आपण पर्यावरण विभागाचे परवान्याचे नुतणीकरण केले नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. पर्यावरण विभागाचे परवानगी व दगडखाण पट्टा परवानगी शिवाय चालविणे बेकायदेशीर असून सदर खाण ही अनाधिकृतपणे चालू असल्याचे दिसून येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांनी मासिक सभेमध्ये नाराजी व्यक्त करत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

ही कारवाई अमोल कुंभार तहसीलदार दक्षिण सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली जगदेवप्पा धनुरे मंडळ अधिकारी बोरामनी, मनोज मेंगर्ती मंडळ अधिकारी मुस्ती, तलाठी समाधान काळे, आरिफ हुडीवाले, सुनील पाटील, शिपाई राउफ बिराजदार, कोतवाल हमीद शेख, सचिन व्हानमाणे यांनी केली.

कारवाई करण्यात आलेल्या खाण चालकांची नावे पुढीलप्रमाणे...

१. शाम बाळकृष्ण मंठाळकर रा. गंगेवाडी

२. अशोक अर्जुन धोत्रीकर रा. गंगेवाडी

३. अतिश शिवाजी शिंदे रा. गंगेवाडी

४. बाळकिसन विष्णूदास मंत्री रा. गंगेवाडी

५. श्रीनिवास चंद्रकांत मंठाळकर रा. गंगेवाडी

६. अरविंद शिवाजी शिंदे रा. गंगेवाडी

७. मनिषा प्रमोद हुच्चे रा. वळसंग

८. प्रविण गुंडूराव डोंगरे रा. धोत्री

९. लक्ष्मण शंकर चौगुले रा. धोत्री

१०. अरुण भिमाशंकर वाघमोडे रा. गंगेवाडी

११. नितेश दुर्गप्या पवार रा. गंगेवाडी

१२. गणेश प्रकाश वानकर रा. कासेगाव

१३ सुभाष रामचंद्र इंगळे रा. गंगेवाडी

१४. आनंद राजाराम साळुंके रा. गंगेवाडी

१५. वैशाली सिध्देश्वर काळे रा. गंगेवाडी