परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतले श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतले श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन

------------------------------------------------------------------------------------   

पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज):- राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.      

यावेळी मंदिर समितीच्या वतीने नगराध्यक्ष तथा मंदिर समितीच्या पदसिद्ध सदस्य प्रणिती भालके यांनी परिवहन मंत्री सरनाईक यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.  

यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम तसेच राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.