आमदार- समाधान आवताडे परीवाराच्या वतीने कर्मवीर औदुंबर( अण्णा )पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर तालुक्याचे कृषी औद्योगिक क्रांतीचे जनक, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे माजीअध्यक्ष ,पंढरपुर तालुक्याचे भाग्यविधाते लोकप्रिय मा.आमदार तसेच श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखाना ली.वेणूनगर व श्री.विठ्ठल हॉस्पिटलचे संस्थापक कर्मवीर औदुंबर (अण्णा) पाटील यांच्या ९९ व्या जयंतनिमित्त नामकिंत उद्योजक तथा आवताडे शुगर चे चेअरमन श्री.संजय आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील नागरीकांच्या व आवताडे परीवाराच्या वतीने त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी भाजपा जिल्हा संघटन मंत्री श्री. शशिकांत नाना चव्हाण,रयत शिक्षण (जनरल बॉडी) संस्थेचे संचालक व काँग्रेस चे तालुका आध्यक्ष श्री.अमरजित पाटील,भाजपा जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री. सुशांत हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.