पंढरपूर तालुक्यात कायदा - सुव्यवस्थेचा उडाला बोजवारा , शेतकऱ्यावर केला जबर प्राणघातक हल्ला, पोलीस प्रशासन राजकीय दबावाखाली काम करीत असल्याची चर्चा

पंढरपूर तालुक्यात कायदा - सुव्यवस्थेचा उडाला बोजवारा ,    शेतकऱ्यावर केला जबर प्राणघातक हल्ला,   पोलीस प्रशासन राजकीय दबावाखाली काम करीत असल्याची चर्चा

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) तालुक्यातील भैरवनाथवाडी येथील सागर संभाजी डुबल या शेतकऱ्याची देगाव हद्दीत शेतकजमीन आहे.ते सदर जमीन आपल्या वडिलांपासून वहिवाटत आले आहेत. नुकतेच दि.४ डिसेंबर २०२३रोजी नारायण चिंचोली येथील एका राजकीय नेत्याने त्यांच्या  साथीदारांनी डुबल कुटूंबातील सागर डुबल व संभाजी डुबल यांच्यावर लोखंडी पाईप, काठ्यांनी हल्ला करीत बेदम मारहाण केल्याची फिर्याद पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात सदर सागर डुबल यांनी दाखल केली आहे.

सदर प्रकरणातील आरोपी संतोष चव्हाण याने साथीदारांसह केलेला हल्ला हा जीवे मारण्याच्या उद्देशाने केला होता. असे फिर्यादीचे म्हणणे असून  विशेष म्हणजे फिर्यादीने सदर प्रकरणातील आरोपीकडून माझ्या व माझ्या कुटूंबाच्या जीवितास धोका असल्याचे तक्रार दिनांक ९ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली होती. आता ४ डिसेंबरच्या घटनेबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी अजूनही प्रमुख आरोपी मोकाट आहे त्यामुळे पुन्हा जीवितास धोका संभवतो अशी भीती फिर्यादी सागर डुबल यांनी व्यक्त केली आहे.

सदर प्रकरणातील सर्व आरोपीना अटक करून त्यांच्यावर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आपण सोमवार दि. ११ डिसेंबर पासून सोलापूर येथील जिल्हा पोलीस प्रमुख (एस.पी ) कार्यालयासमोर कुटूंबासह आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती सागर डुबल यांनी दिली आहे. तसेच महामार्गाच्या कामात संपादन झालेल्या जमिनीच्या भरपाई बाबत आरोपीकडून सातत्याने दबाव आणला जात आहे .धमक्या दिल्या जात आहेत अशी ही माहिती देण्यात आली.