ग्रंथपालन वर्ग परीक्षेत रूपाली जाधव प्रथम
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर ( दै.पंढरी नगरी न्यूज ) ग्रंथालय संचालक मुंबई व सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ ,सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणाऱ्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा 2024 केंद्र सोलापूरचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये कु.जाधव रूपाली बबन ही 469 गुण मिळवून सोलापूर केंद्रात प्रथम आली. तर ठेंगे उज्वला राजशेखर या 407 गुण मिळवून द्वितीय व शिंदे जयश्री वैजनाथ ही 404 गुण मिळवून सोलापूर केंद्रात तृतीया आली. दहावी उत्तीर्ण नंतर तीन महिन्याचा असणाऱ्या या कोर्सला डी एड स्केल असून हा कोर्स केल्यानंतर ग्रंथपाल म्हणून शाळा, कॉलेज, पब्लिक लायब्ररी दवाखाना ,बँक इत्यादी ठिकाणी काम करता येते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी चार वाजता सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ, सोलापूर च्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमोद पाटील ग्रंथालय निरीक्षक सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर यांचे शुभ हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपत्र वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्गशिक्षिका वृषाली हजारे यांनी केले तर मार्गदर्शक ग्रंथमित्र कुंडलिक मोरे वर्गव्यवस्थापिका सौ सारिका मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .अध्यक्षीय मनोगतात मा. प्रमोद पाटील यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी फक्त हा कोर्स करून न थांबता ग्रंथालय क्षेत्रामध्ये उत्तम असे करिअर करावे असेही त्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले .अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुढच्या वेळी अतिशय चांगला अभ्यास करून यश संपादन करावे असेही त्यांनी सांगितले.
हा कोर्स यशस्वी करण्याकरिता मार्गदर्शक ग्रंथमित्र कुंडलिक मोरे वर्गव्यवस्थापिका सौ सारिका मोरे, मुख्याध्यापक अविनाश गायकवाड, शिक्षक गणेश फंड ,दत्ता मोरे , संतोष भागवत, वृषाली हजारे लिपिक सौ सारिका माडीकर सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयकुमार पवार सर्व पदाधिकारी सेवक गीतांजली गंभीरे यांच्यासह छत्रपती शिवाजी प्रशालेचे अध्यक्ष मनोहर सपाटे ,मुख्याध्यापिका जुगदार मॅडम, शाळेचा स्टाफ यांचे सहकार्य लाभले लिपिक सारिका माडीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.