क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन शासकीय योजनेचा पालक मेळावा पंढरपुरात संपन्न.. पालक मेळाव्यास महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन शासकीय योजनेचा पालक मेळावा पंढरपुरात संपन्न..  पालक  मेळाव्यास महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दैनिक,पंढरी नगरी न्यूज ) भारतरत्न डॉ. आंबेडकर सार्वजनिक वाचनालय तपकिरी शेटफळ ता . पंढरपूर संचलित, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन शासकीय योजनेच्या लाभार्थी पालकांचा मेळावा उत्सवाच्या संपन्न झाला . दिनांक १५ मार्च २०२५ रोजी पंढरपूर येथील हॉटेल धनश्रीच्या कान्फरन्स हॉलमध्ये पंढरपूर शहर व तालुक्यातील लाभार्थी पालकांच्या बँक सीडींग समस्या व इतर अडीअडचणी बाबत " पालक मेळावा घेण्यात आला.

या मेळाव्याला १०० पेक्षा अधिक पालकांनी उत्सफूर्तपणे उपस्थिती दाखवून बालसंगोपन योजनेबाबत संस्था करित असलेल्या उपक्रमास भरभरून पाठींबा देवून संस्थेच्या कामा बाबत समाधान व्यक्त केले. या मेळाव्यामध्ये पंढरपूर येथील नवरंगे बालकाश्रमास बालस्नेही पुरस्काराने सन्मानित केल्या बद्दल नवरंगे बालकाश्रम च्या अधिक्षिका ॲड. राजश्री गाडे मॅडम श्रीयुत डफळे सरांचा व त्यांच्या स्टाफचा बाल कल्याण समिति सोलापूरचे माजी सदस्य ॲड . विलास शिंदे यांचे हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला .

यावेळी बोलताना ॲड. राजश्री गाडे मॅडम व ॲड . विलास शिंदे यांनी संस्थेच्या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. पंढरपूर येथील धनश्री हॉटेलच्या अलिशान कान्फरस हॉलमध्ये मेळावा आयोजीत केल्या बद्दल संस्थेचे कौतुक करून धन्यवाद दिले. तसेच पालकांनीही या मेळाव्या बद्दल अतिशय समाधान व्यक्त करून संस्थेच्या सर्व उपक्रमास भरभरून पाठींबा व्यक्त केला . मार्गदर्शनपर भाषणात संस्थेचे अध्यक्ष शत्रुघ्न कांबळे सरांनी बालसंगोपन योजनेच्या कार्यपद्धतीची माहीती देवून ज्या पालकांना अद्यापही अनुदान आले नाही त्यांना धीर देवून अनुदान सर्वांना मिळेल थोडा धीर धरा शासन यंत्रणेवर विश्वास ठेवा असे आवाहन करून संस्था केवळ २२५० रुपयेच्या अनुदानावर न थांबता बालकांच्या व पालकांच्या सर्वांगीण विकासाकरिता सतत प्रयत्न करेल . लाभार्थी बालकांच्या व पालकांकरिता त्यांच्या आरोग्यावर शैक्षणिक प्रगतीसाठी व कुटुंब सक्षमीकरणासाठी प्रयत्न करेल आणि लवकरच पालकांची गैरसोय टाकण्यासाठी पंढरपूर शहरात बालसंगोन योजनेचे कार्यालय सुरू करण्याचा प्रयत्न करेल असे सांगुन पालकांना आश्वस्थ केले. भविष्यात पालकांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी स्वयंरोजगार निर्मितीसाठी संस्था प्रयत्नशिल असेल असे सांगून उपस्थीत पालकांचे आभार व्यक्त केले.

कार्यकमाच्या शेवटी संस्थेच्या सोशल वर्कर ज्योती मॅडम यांनी आभार मानले . या मेळाव्यासाठी ,अतुल सटाले सर , भरतकुमार कांबळे , गणेश मासाळ , चंद्रकांत बोडके , हर्षराज कांबळे यांचे सहकार्य लाभले.