सिद्धेवाडी येथील प्रशांत उर्फ बंटी जाधव यांची सीएच्या ( C.A ) परीक्षेत उत्तीर्ण ◼️ उज्वल यशाने अखेर हिरा चमकला बंटीच्या आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले.. ◼️ सिद्धेवाडी पंचक्रोशीत सी .ए चा पहिला बहुमान, मित्र परिवारामध्ये उत्साहाचे वातावरण
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील मौजे सिद्धेवाडी येथील मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त झालेले स्वर्गीय. शिवाजी (आप्पा) नरहरी जाधव यांचे नातू व संभाजी( कुमार दादा) शिवाजी जाधव यांचे सुपुत्र प्रशांत संभाजी जाधव रा.मुंबई, सन -2025 मध्ये घेण्यात आलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया ( C. A) परीक्षेत प्रथम क्रमांकाने पास झाला .
प्रशांत उर्फ बंटी जाधव यांचे शिक्षण पहिली ते दहावी पर्यंत मुंबई येथील इंडियन एज्युकेशन सोसायटी तर पुढील महाविद्यालयीन एम. कॉम शिक्षणासाठी एम .एल दहाणूकर कॉलेज मुंबई येथे झाले आहे. सीए झालेला प्रशांत उर्फ बंटी जाधव याने अतिशय जिद्द व मोठ्या परिश्रमाने या परीक्षेत उत्कृष्टरित्या घवघवीत उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल सिद्धेवाडीतील लहान - थोर मित्रमंडळी तसेच नातेवाईक, ग्रामस्थांकडून यांचे अभिनंदनपर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. गावात सर्वत्र त्याला बंटी या नावाने ओळखले जात असून मुंबई येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजाराम शिवाजी जाधव यांचे ते पुतणे आहेत.