◼️ पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा सन-2025 ◼️ पंढरपूर नगरपरिषद व पंढरपूर पोलिस प्रशासन यांच्या वतीने,
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज) "स्वच्छ - सुंदर हरित पंढरपूर" या संकल्पनेवर आधारित पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा सन- 2025 आयोजित करण्यात आली आहे.
पंढरपूर शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, या स्पर्धेत सहभागी व्हावे, आणि पर्यावरण-स्वच्छता जनजागृती सोबतच आकर्षक बक्षीसे पंढरपूर शहरातील सर्व गणेशोत्सव तरुण मंडळाने स्पर्धेत उस्फूर्तपणे सहभागी होऊन या कार्यक्रमास शोभा वाढवावी तसेच बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवावी असे आवाहन पंढरपूर नगरपरिषद व पंढरपूर पोलीस प्रशासन यांच्या वतीने करण्यात येत आहे.
???? विजेत्या मंडळांसाठी आकर्षक बक्षिसे ????
???? प्रथम क्रमांक – ₹ 21,000/- + सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
???? द्वितीय क्रमांक – ₹ 15,000/- + सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
???? तृतीय क्रमांक – ₹ 10,000/- + सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,
◼️ स्पर्धेतील निकष खालीलप्रमाणे -
पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट, ध्वनीप्रदूषणमुक्त वातावरण, पारंपरिक वाद्यांचा वापर,
◼️ सामाजिक उपक्रम -
प्लास्टिक मुक्त जनजागृती व डस्टबिनचा वापर,
वृक्षारोपण व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता.
नाव नोंदणीची तारीख: 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2025
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लगेच नाव नोंदणी करिता
अधटराव – 9370853285,
जोजारे – 7020286147,
पवार (पोलीस हवालदार) – 9823990732 यांच्याकडे संपर्क साधावा संपर्क साधण्याचे ठिकाण पंढरपूर नगरपरिषद
कार्यालय: 4075/अ, भादुले चौक, पंढरपूर येथे आपली नावे नोंदवावीत