गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पोलिस प्रशासनाचे दंगा काबू यंत्रणेची रंगीत तालीम. ◾पंढरपूर विभागाचे डीवायएसपी प्रशांत डगळे यांची माहिती. ◾पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक सुरेश चिल्हावार व शहर पोलीस निरीक्षक महेश ढवण यांची गणरायाच्या सणउत्सव काळात घडामोडीवर करडी नजर.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  पंढरपुरात पोलिस प्रशासनाचे  दंगा काबू यंत्रणेची रंगीत तालीम.  ◾पंढरपूर विभागाचे डीवायएसपी प्रशांत डगळे यांची माहिती.  ◾पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक सुरेश चिल्हावार व शहर पोलीस निरीक्षक महेश ढवण यांची गणरायाच्या  सणउत्सव काळात घडामोडीवर करडी नजर.


--------------------------------------------------------------------------
        
पंढरपूर,(दै.पंढरी नगरी न्यूज):- पंढरपूर शहर व तालुक्यात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच काही अनुचित प्रकार घडल्यास या प्रसंगाला पोलिसांनी कसे सामोरे जायचे व परिस्थिती कशी नियंत्रणात आणायची यासंदर्भात .पंढरपूर शहर पोलीस ठाणे, पंढरपूर ग्रामीण ,व तालुका पोलीस ठाणे  यांनी संयुक्तपणे रेल्वे मैदान पंढरपूर  येथे मॉकड्रिल अर्थात दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली.

पंढरपूर शहर व तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात व उत्साहात साजरा होणार आहे. गेल्या काही वर्षापासून गणेशोत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक झाले असून यंदा पंढरपूर शहर व तालुक्यात सार्वजनिक मंडळे व घरगुती गणपतींची अतिशय भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली जाते. हा दहा दिवसांचा उत्सव पूर्णपणे निर्विघ्न, सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात पार पडावा यासाठी पोलीस प्रशासन पंढरपूर विभागाचे डीवायएसपी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाले आहे.

   ​उत्सवाच्या काळात आगमन व विसर्जन मिरवणुका, भव्य देखावे आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच संभाव्य आपत्कालीन किंवा तणावपूर्ण परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवता यावे, यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. पोलीस प्रशासनाच्या वतीने ‘दंगल नियंत्रण योजने’अंतर्गत (मॉक ड्रिल) एक विशेष रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये १० पोलीस अधिकारी  ५५ ठाणे अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.