पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात माजी आमदार स्वर्गीय, सुधाकरपंत परिचारक यांचा पुतळा उभारणार :- सभापती हरीश गायकवाड. ◾बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी.
---------------------------------------------------------------------------
पंढरपूर,( दै. पंढरी नगरी न्यूज ):-सोलापूर जिल्ह्यात सहकाराचे डॉक्टर म्हणून महाराष्ट्रभर ओळख असणारे माजी आमदार स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी त्यांच्या सामाजिक व राजकीय हयातीत सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विकास करण्याकरिता पंढरपूरसह संबंध सोलापूर जिल्ह्यातसह सर्वांगीण विकास करण्याचा त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याने पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आज राज्यात नावारूपास आली असून त्यांचे कायम स्मरण होण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात स्वर्गीय परिचारक यांचा भव्य पुतळा उभा करून त्यांच्या विचाराद्वारे कारभार करण्यात येत असल्याचे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड यांनी व्यक्त केले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती हरीश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार तथा श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत बाजार समितीच्या सभागृहात खेळण्याच्या वातावरणात पार पडली यावेळी बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड म्हणाले की, बाजार समितीची वार्षिक उलाढाल ६६० कोटी पर्यंत होत असल्याचे सांगून बाजार समितीत फळे, भाजीपाला नवीन मार्केट कमिटीतील गाळे, डाळिंब बाजार भरतो त्या ठिकाणी कॉंक्रिटीकरण करणे, बाजार समितीच्या आवारात प्रखर सौर ऊर्जा प्रकल्प सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे सर्वसाधारण सभेत सांगितले. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालास बाजार समितीत चांगल्या प्रकारे दर मिळत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार तथा श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक म्हणाले की , बाजार समितीमार्फत व्यापार वाढीसाठी भविष्यात आणखीन सोयी- सुविधा पुरविल्या जातील त्याकरिता व्यवसाय विकास आराखडा अंतर्गत अनुदानामधून विविध विकास कामे करण्याबाबत बाजार समितीने कृषी पणन महामंडळाच्या वतीने अहवाल सादर केलेला आहे त्यामुळे बाजार समितीत आर्थिक उत्पन्न मिळण्याकरता अनेक नवीन प्रकल्प राबवले जातील अशी माहिती माजी आमदार परिचारक यांनी दिली.