जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सिद्धेवाडी; जाधव- नागणेवस्ती शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अंजली आवताडे तर उपाध्यक्षपदी रेखा जाधव ,निवड समितीवर महिलाराज;

जिल्हा परिषद प्राथमिक  केंद्र शाळा सिद्धेवाडी; जाधव- नागणेवस्ती शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अंजली आवताडे तर उपाध्यक्षपदी रेखा जाधव ,निवड समितीवर महिलाराज;

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधव- नागणेवस्ती शाळेच्या व्यवस्थापन समितीचे आज रोजी  पुनर्गठन करण्यात आले. सर्वानुमते या समितीत सर्व सदस्य महिलाच असाव्यात असे ठरवले. त्यानुसार महिला सदस्यांची निवड करण्यात आली. त्यांच्यातून अध्यक्षा म्हणून सौ. अंजली गणेश आवताडे तर उपाध्यक्षा म्हणुन सौ. रेखा तानाजी जाधव यांची निवड करण्यात आली. त्यांचा स्वागतपर सत्कार विद्यमान शिक्षणप्रेमी सदस्या सौ. सुप्रियाताई धुरूपे यांच्या हस्ते करण्यात आला. व्यवस्थापन समितीच्या सदस्या म्हणुन सौ. सुजाता प्रमोद घाळे, सौ. शुभांगी अनिल राऊत, सौ. राणी अमृत शिंदे, सौ.कोमल समाधान ताड, सौ.प्रीती संजय आवताडे, सौ. निलम मोहन साळुंखे आणि सौ. विद्या संजय नागणे यांची निवड करण्यात आली. ग्रा.पं. सदस्य सौ. आशा बालाजी जाधव आणि शिक्षक सदस्य तेजस्विनी विश्वासकुमार घोडके मॅडम यांना घेण्यात आले.
      
सर्वांच्या निवडी अतिशय उत्साहात आणि आनंदी वातावरणात झाल्या. यावेळी सेवानिवृत्त ताड सर, नवनाथ धूरुपे, कुमार कुरे, संजय नागणे, प्रमोद घाळे, अमृत शिंदे, तानाजी जाधव, राहूल जाधव, संजय कुरे, मोहन साळुंखे, कळकुंबे, अनपट, विजय जाधव, पांडूरंग जाधव व अन्य पालक आणि महिला भगिनी हजर होत्या. सर्वांचे स्वागत एम. बी. जाधव यांनी केले, तर आभार धनाजी जाधव सर यांनी मानले.