सोलापूरचे डब्ल्यू आय टी कॉलेजचे मुले - मुली टेबल टेनिस स्पर्धेत प्रथम कर्मवीर जगदाळे मामा क्रीडा संकुलनात ही स्पर्धा पार पडली

सोलापूरचे डब्ल्यू आय टी कॉलेजचे मुले - मुली टेबल टेनिस स्पर्धेत प्रथम   कर्मवीर जगदाळे मामा क्रीडा संकुलनात ही स्पर्धा पार पडली

------------------------------------------------------------------------------------

बार्शी (दै. पंढरी नगरी न्यूज) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने आंतर महाविद्यालयीन मुले व मुलींच्या टेबल टेनिस स्पर्धा बार्शी येथील जगदाळे मामा मैदानावर ०७ व ०८ ऑक्टोबर २०२४ दरम्यान संपन्न झाल्या. यात सोलापूरच्या डब्ल्यू आय टी कॉलेजच्या मुले व मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.

प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्पर्धेचे उदघाटन प्रशांत पैकेकर व संस्थेचे सहसचिव अरुण देबाडवार यांच्या उपस्थितीत झाले. अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ .सुग्रीव गोरे होते.यावेळी एन .एन पुदे, बाळासाहेब वाघचौरे,दत्ता बिराजदार, डॉ .एस एम लांडगे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे पैकीकर म्हणाले की ,कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या शिक्षण संस्थेचा मी माजी विद्यार्थी आहे.मी या शिक्षण संस्थेत उत्तम शिक्षण घेतले .त्याचबरोबर अनेक खेळांमध्ये सहभाग घेतला. या महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक एक उत्तम खेळाडू आहेत त्यांचा आदर्श मी डोळ्यासमोर ठेवला आहे. बालपणापासून या शिक्षण संस्थेतील क्रीडांगणावर मी खेळलो आहे. आपणास कोणत्याही प्रकारची मदत देण्यास मी तयार असल्याचे सांगितले.टेबल टेनिस स्पर्धेत सहभागी सर्व संघांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. उद्घाटक श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी चे सहसचिव श्री अरुण देबडवार म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात खेळाला अननसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आपण सर्वांनी व्यायाम करणे ,खेळ खेळणे हे काळाची गरज बनली आहे .म्हणून स्पर्धक सहभागींचे त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुग्रीव गोरे यांनी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाबरोबर शारीरिक शिक्षणाची सोय व्हावी म्हणून संस्थेच्या प्रत्येक शाखेत सुसज्य क्रीडांगणे निर्माण केली आहेत. आज या परिसरात इनडोअर हॉल ,400 मीटरचा ट्रॅक, स्विमिंग पूल, सुसज्ज जिम, विविध खेळाची क्रीडांगणे उपलब्ध असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण होत आहेत. हे सांगताना मला आनंद होत आहे.आपण सर्वजण विविध महाविद्यालयातून एक गुणवंत क्रीडापटू विद्यार्थी म्हणून आलेला आहात. स्पर्धेतील आपलं कौशल्य प्रदर्शित करा. मी या कर्मवीर शैक्षणिक संकुलात तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत करून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर महाविद्यालयाने टेनिस टेबल स्पर्धक विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे उद्घाटक व अतिथी यांचा परिचय डॉ.ये.जी.कांबळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. स्मिता सुरवसे यांनी केले.आभार डॉ. एस एम लांडगे यांनी मानले.

स्पर्धेचा निकाल - डब्ल्यू आय टी कॉलेज, सोलापूर - प्रथम,डी एस टी एस फार्मसी कॉलेज, सोलापूर- द्वितीय, एन बी एन कॉलेज सोलापूर- तृतीय ( मुले संघ) डब्ल्यू आय टी कॉलेज, सोलापूर - प्रथम, डी एस टी एस फार्मसी कॉलेज, सोलापूर- द्वितीय,सांगोला महाविद्यालय, सांगोला - तृतीय ( मुली संघ) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुग्रीव गोरे यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले. त्यांच्या हस्ते विजयी संघाचे बक्षीस वितरण करण्यात आले.