विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद झाल्याने भाविकांना ताटकळत उभे राहण्याचे सात ते आठ तास झाले कमी, ◼️ विठ्ठल भक्तामध्ये आनंदाचे वातावरण

विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद झाल्याने भाविकांना ताटकळत उभे राहण्याचे सात ते आठ तास झाले कमी,  ◼️ विठ्ठल भक्तामध्ये आनंदाचे वातावरण

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज) आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असून त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. तसेच व्हीआयपी दर्शन बंद झाल्यामुळे सात ते आठ तास भाविकांना ताटकळत उभे राहण्याचा वेळ कमी झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री जयकुमार गोरे हे शासकीय विश्रामगृह ते पत्रा शेड येथील दर्शन रांगेपर्यंत स्वतः बुलेट घेऊन दर्शन रांगेच्या पाहणीसाठी आले, पाठीमागे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन होते. तर दर्शन रांग ते वळवंट परिसरापर्यंत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी बुलेट घेतली.

पालकमंत्र्याकडून दर्शन रांगेतील भाविकांना तांदळाच्या खिचडीचे वाटप :- 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेतील भाविकांसाठी मोफत अन्न दानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आज पालकमंत्री जयकुमार गोरे हे दर्शन रांगेची पाहणी करण्यासाठी आले असताना त्यांनी स्वतः दर्शन रांगेतील भाविकांना तांदळाच्या ‍ खिचडीचे वाटप केले. 

यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत भुजबळ, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार सचिन लंगुटे, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्यासह संबंधित ठिकाणचे स्थानिक अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.