सायबर सिक्युरिटी ही काळाची गरज. ◾जळगावातील नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शन.
-----------------------------------------------------------------------
जळगाव ,( दै.पंढरी नगरी न्यूज ):-आजच्या डिजिटल युगात सायबर सिक्युरिटी ही केवळ तांत्रिक विषय नसून प्रत्येक नागरिकाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर ब्राह्मण सभागृह येथे आयोजित बैठकीत नागरिकांसाठी विशेष सायबर सिक्युरिटी इम्पॅक्ट सेशन घेण्यात आले.
सायबर वॉरियर विद्या विशाल सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी उपस्थित नागरिकांना सायबर सिक्युरिटीची माहिती देत विविध ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारांबद्दल जागरूक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यालय सचिव गणेश भगवान माळी यांनी सहकार्य केले. हा उपक्रम डॉ. आर. बी. आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
नागरिकांना Quick Heal Foundation च्या Anti Fraud App विषयी माहिती देण्यात आली. ॲपचा उपयोग आणि डिजिटल सुरक्षेतील त्याचे महत्त्व समजावून सांगत नागरिकांच्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड करून घेण्यात आले.