अध्यात्मिक व्यासपीठावर पोहोचला सायबर सुरक्षेचा संदेश; ज्येष्ठ नागरिकांमध्ये जनजागृती.

अध्यात्मिक व्यासपीठावर पोहोचला सायबर सुरक्षेचा संदेश; ज्येष्ठ नागरिकांमध्ये जनजागृती.


--------------------------------------------------------------------------
जळगाव (दै.पंढरी नगरी न्यूज ):- अध्यात्मिक वातावरणासोबत डिजिटल सुरक्षेची जोड देत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, जळगाव येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

सोमनाथ वडनेर यांच्या सहकार्याने झालेल्या या उपक्रमाला मीनाक्षी दीदी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

क्विक हिल फाउंडेशन च्या  सायबर वॉरियर उपक्रमातील साक्षी पाटील, विद्या सोनवणे, लोकेश पाटील आणि अक्षय पाटील यांनी उपस्थितांना ऑनलाइन फसवणूक, ओटीपी फिशिंग, फेक लिंक्स पासवर्ड सिक्युरिटीआणि सोशल मीडिया सेफ्टी याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमादरम्यान काही उपस्थितांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवांबाबत आणि यापूर्वी त्यांच्यासोबत घडलेल्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांबाबत प्रश्न विचारले. सायबर वॉरियर यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून अशा परिस्थितीत कोणती पावले उचलावीत, कोणती खबरदारी घ्यावी आणि भविष्यात अशा फसवणुकीपासून कसे सुरक्षित राहावे, याबाबत मार्गदर्शन केले.

 ज्येष्ठ व मोठ्या नागरिकांना ऑनलाइन व्यवहार करताना सावध राहण्याचे आणि ओटीपी, पिन पासवर्ड किंवा बँकिंग माहिती कोणालाही न देण्याचे आवाहन करण्यात आले.